महाराष्ट्रातील शेतकरी पिक विमा कधी मिळणार आहे या प्रतीक्षेत आहेत आणि पीक विमा काही ठिकाणी जमा झालेला आहे तर काही ठिकाणी जमा झाले नाही चला पाहूया ते बद्दलचे संपूर्ण माहिती
महाराष्ट्र मध्ये बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता एक रुपया भरून पिक विमा योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केली होती यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता पण 25% अग्रीम पिक विमा जमा कधी होणार आहे याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे
25% अग्रीम पीक विमा दिवाळीपूर्वी जमा होणार होता पण काही कंपन्यांच्या कारणामुळे विमा कंपन्या ंनी पिक विमा देण्यास नकार दिला त्यामुळे पिक विमा जमा व्हायला विलंब लागलेला आहे तरी पिक विमा लवकरात लवकर जमा करावा असे शेतकऱ्यांची इच्छा आहे
महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये दोन महिने पाऊसच पडला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे व दुष्काळाचे संकट आहे त्यामध्ये आता पिक विमा जमा होणार नाही असे अफवा पसरली होती पण तसं काही नाहीये असं सरकारने सांगितलेले आहे
यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन आपला स्टेटस चेक करून घ्यायचा आहे व तसेच ईपीक पाहणी व्यवस्थित केलेली आहे का ते पाहायचे आहेत व नुकसान भरपाई फॉर्म भरून घ्यायचा आहे
24 जिल्ह्यांमध्ये 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये पिक विमा जमा करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे पण यापैकी 17 20 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे उर्वरित रक्कम लवकरात लवकर जमा करावे असे आदेश कृषी मंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेले आहेत
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून घेऊन त्या भागामध्ये नुकसान भरपाई पिक विमा बरोबरच द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे