Pik vima Yojana Maharashtra 2023 : पीक विमा योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज / पीक विमा योजना लिस्ट / पीक विमा योजना माहिती
Pik vima Yojana Maharashtra 2023 : पिक विमा योजना महाराष्ट्र शासन : महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेले पीक विमा योजने बद्दल माहिती घेऊया महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजना फक्त एक रुपया भरून सर्व शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतात या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे की या योजनेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि त्या योजनेचा फायदा घ्यावा. राज्य सरकारने नुकसानीसाठी भरपाई म्हणून ही योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता शासनाने पिक विमा योजना सुरू केलेली आहे याबद्दल चे सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे
या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे ?
पिक विमा काय आहे ?
योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार?
या मध्ये कोणत्या पिकांना लाभ होऊ शकतो ?
Pik vima Yojana Maharashtra 2023 : पिक विमा योजना बद्दल थोडक्यात माहिती :
Pik vima Yojana Maharashtra :हवामानातील विविध होणारे बदल व वातावरणातील बदलामुळे अलीकडे शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागते आहे यामध्ये दुष्काळ महापूर अतिवृष्टी नैसर्गिक व अनैसर्गिक रित्या होणाऱ्या संकटामुळे शेतीचे नुकसान होत आहे प्रमाणे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी कमकुवत होत चाललेला आहे या सर्व बदलांमुळे महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एक नवीन योजना ज्यामध्ये कमी खर्चामध्ये विमा ची सुविधा शासनाने राबवलेले आहे पिक विमा भरत असताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर लूट होताना दिसत आहे यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रार देखील केली बाबी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शेतकरी घेत आहेत त्या पद्धतीने शेतकरी एक रुपया भरून पीक विमा घेणार मग उर्वरित रक्कम कोण भरणार याबद्दल शंका उपस्थित झाली पण उर्वरित पैसे राज्य सरकार भरणारे असल्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे पाहत आहोत की सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा समर्थन केलेले आहे याबाबत सर्व शेतकरी समाधानकारक वक्तव्य करत आहे कारण शेतकरी समाधी आणि असेल तर सर्व गोष्टी व्यवस्थित चालतात
Pik vima Yojana Maharashtra 2023 : या योजनेमध्ये कोणत्या पिकांना लाभ होऊ शकतो ?
महाराष्ट्र मध्ये त्याने अनेक पिके घेतली जातात विविध जिल्ह्यामध्ये विविध पिके घेतली जातात ज्या पद्धतीने ऊस शेती शेती द्राक्ष शेती कापूस शेती ही प्रामुख्याने उत्पादने शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतात त्या पद्धतीने हंगामातील बाजरी भुईमूग तांदूळ ज्वारी नाचणी मूग उडीद मका तूर कापूस तीळ कांदा अशा वेगवेगळ्या पिकांचेही शेतकरी घेत असतात यामध्ये शेतकरी सीजन अनुसार वातावरणानुसार पिके घेत असतात त्यामध्ये हंगामानुसार घेतलेल्या पिकांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त आहे मध्ये वातावरणामध्ये होणारे बदल दुष्काळी भाग व पावसाळी भाग यामध्ये समाविष्ट होतात त्या पद्धतीने होणाऱ्या बदलामुळे किंवा नुकसानीमुळे काही पिकांची नासाडी व पिके खराब होताना दिसतात यामध्ये महाराष्ट्र सरकारने या 14 पिकांचा समावेश करण्याबाबत अधिसूचना दिलेले आहेत
खरीप हंगामातील बाजरी, ज्वारी, भुईमूग, उडीद, नाचणी, मका, सोयाबीन, कारले, तीळ, कापूस ,कांदा. या पिकांचा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे कारण ही पिके घेतली जातात आणि या पिकांमध्ये जास्तीत प्रमाणात नुकसानीची शक्यता असते
महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना लिस्ट व माहिती
Pik vima Yojana Maharashtra 2023 : पिक विमा योजनेचा अर्ज कुठे भरायचा ?
पिक विमा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अर्जाची पद्धत खूप सोपी आहे महाराष्ट्र सरकारने यासाठी खूप सोप्या पद्धतीने शेतकरी अर्ज करू शकतात याची काळजी घेतलेली आहे त्यासाठी सरकारकडून दिलेल्या या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती दिलेली आहे त्यामध्ये शेतकरी स्वतः आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये जाऊन त्यांचा पीक विमा शकणार आहेत यामध्ये नमूद केलेल्या 14 पिकांपैकी कोणत्याही पिकासाठी पीक विमा नंतर त्या साठी तुम्हाला एकच प्रक्रिया करायचे आहे
पीक विमा योजना महाराष्ट्र
Pik vima Yojana Maharashtra :यासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास शेतकऱ्यांना अधिकचा होणारा त्रास दूर करण्यासाठी वेगवेगळ्या समितीची बैठक स्थापना करून वेगवेगळे निकष दूर करून शेतकऱ्यांची पीक विम्याचा लाभ मिळावा हेच आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पिक विमा भरला नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही आहे तसेच या पीक विमा चा लाभ तुम्ही जवळच्या असलेल्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन भरू शकता तसेच सरकारी सेवा केंद्रे जागोजागी सरकारने उभा केलेले आहेत त्या पद्धतीने तिथे जाऊन तुम्ही भरू शकता कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाही या योजनेबरोबरच केंद्र सरकारने व राज्य सरकारने पी एम किसान शेतकरी सन्मान योजना या योजनांचा ही यामध्ये समावेश केलेला आहे यामध्ये राज्य सरकारचे नमो शेतकरी सन्मान योजना असेल किंवा शेतकरी योजनांच्या योजनांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात व मराठी शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्साहन आहे व त्याचबरोबर आर्थिक मदत करण्याचेही आवाहन केलेले आहे
Pik vima Yojana Maharashtra 2023 : या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :
अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थितपणे करावी :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- डोमेसाइल सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- सातबारा खाते उतारा
Pik vima Yojana Maharashtra 2023 : अर्ज कसा भरावा ?
Pik vima Yojana Maharashtra : या योजनेच्या साठी अर्ज करण्यासाठी https://pmfby.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन दिलेले सर्व माहिती वाचून घ्यायची आहे व त्या पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा जवळच्या सरकारी सेवा केंद्रात जाऊन अर्ज करायचा आहे
पीक विमा घोषणा पत्र : येथे क्लिक करा
Pik vima Yojana Maharashtra 2023 : पिक विमा देणाऱ्या कंपन्यांची यादी :
- आयसीआयसीआय लंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दो
- ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- युनिव्हर्सल जनरल कंपनी लिमिटेड
- भारतीय कृषी विमा कंपनी
- चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- एम बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
नमस्कार मित्रहो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी अपडेट व योजनांचे अपडेट आम्ही या वेबसाईटवर देत असतो या माहितीचा फायदा तुम्ही स्वतः घेऊ शकता व तुमच्या सहकार्याने शेअर करून तुम्ही त्यांनाही या योजनांचा व भरतीचा फायदा घेऊन देऊ शकता अशाच प्रकारच्या डेली माहितीसाठी साईटला सबस्क्राईब करू शकता
हे पण पहा :